Tuesday, February 4, 2014

BION NATURE CLUB

 
 

आमची मदत

निसर्गामध्ये (जंगलामध्ये) फिरत असताना अर्धवट माहितीवर व स्थानिक गाईडशिवाय फिरणे धोक्याचे असते. यामुळे आपल्याला पर्यटनाचा योग्य आनंद लुटता येणार नाही. आपले पर्यटन त्रासदायक ठरु शकते.
राधानगरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पर्यटन विषयक सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. म्हणून आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आमचा हा नेचर क्लब कटिबद्ध आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये योग्य निसर्ग पर्यटनाचा आपण आनंद लुटु शकता. आम्ही पर्यटन व्यावसायिक नाही आहोत. स्व:ताचे नोकरी,व्यवसाय सांभाळत राधानगरीच्या निसर्गाचा तुम्हाला मनसोक्त लाभ घेता यावा ह्यासाठी हा आम्ही ह्या नेचर क्लब ची स्थापना केली आहे.
आम्ही आपल्या निवासाची,नाष्टा,भोजन, तसेच हवी असल्यास वाहनाची पण सोय अगदी माफक शुल्कामध्ये करतो. त्याच बरोबर स्थानिक गाईड, सर्व पर्यटन स्थळांची योग्य माहिती आम्ही आपणास उपलब्ध करुन देतो.तसेच नेचर ट्रेल, नाईट ट्रेल, स्लाईड शो, वाईल्ड लाईफ फिल्म, नेचर अ‍ॅंड वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, ग्रुप डिस्कशन, expert मार्गदर्शन याची पण सोय करु शकतो. आपण राधानगरी ह्या ठिकाणाहुन १ दिवसामध्ये होणारी कोल्हापुर दर्शन अथवा कोंकण दर्शन(सिंधुदुर्ग परिसर) ही सहल पण करु शकता. ह्यासाठीही आम्ही आपणास पुर्ण सहकार्य करतो. आम्ही आतापर्यत अनेक महाविद्यालये, शाळा, सोसायटी मंडळे, ट्रेकर्स ग्रुप, रोटरी क्लब, फँमिली यांच्या सहली यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. चला मग निसर्गसंपन्न राधानगरी मध्ये निसर्गपर्यटनाचा आनंद लुटायला.तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोतच.

संपर्क:

बायसन नेचर क्लब,
गणेश मंदिराजवळ,
मु.पो.ता.राधानगरी,
जि.कोल्हापुर.
पिन नं. 416212
 
Email:bisonnatureclub@gmail.com
                                                                             
 
Samrat- 9604113743, 9421174337
                                                              

 
                                                                         BISON NATURE CLUB

Saturday, February 1, 2014

दाजीपुर

दाजीपुर अभयारण्य
भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण असणार्‍या पश्चिम घाटात राधानगरी म्हणजेच दाजिपुर अभयारण्य आहे.दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.निमसदाहारीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो.कोल्हापुर जिल्हयाच्या पश्चिमेस असणार्‍या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मि. आहे.समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फ़ूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी.मी. आहे.
दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्यचाच एक भाग आहे. पूर्वी हे जंगल शिकारी करता राखीव होते. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली.महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून याची नोंद आहे.राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परीसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत.सडयावर व सडयाच्या भोवताली असणार्‍या दाट जंगलामधे एक संपन्न जैवविविधता आढळते.
tigar
प्राणी:.राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारच्या वन्यप्राण्याची नोंद झालेली आहे. यामधे दुर्मिळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ,बिबळ्या व फ़क्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा(पिसोरी) यांचा समावेश आहे. तसेच गवा, सांबर,भेकर,रानकुत्रा,अस्वल,चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर,उदमांजर, खवलेमांजर,शेकरु, ससा,लंगूर याच बरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.
bird
पक्षी: निरीक्षणासाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे.राधानगरी अभयारण्यात आजमितीस २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे.यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगीरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबील, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.जगात फ़क्त पश्चिम घाटात आढळणार्‍या पक्षांपैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात.अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदीर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.

orchid
वनस्पती:भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्व म्हणजे निमसदाहरीत व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे.डोंगरातील दर्‍याखोर्‍यातील घनदाट जंगल,विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष,वेली,झुडपे,ऑर्किड्स,फुले,नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडारआहे.करवंद,कारवी,निरगुडी,अडुळसा, तोरण,शिकेकाई,रानमिरी,मुरुडशेंग,सर्पगंधा, वाघाटी,धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.
lizard
सरिसृप व उभयचर:सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली,सरडे,साप-सुरळी आढळतात.उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या पंरतू दुर्लक्षीत अश्या उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे बी.एन.एच.एस. चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला.त्या पालीचे नामकरण cenmaspis kolhapurensis करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.ऑलिव्ह ‍फ़ॉरेस्ट स्नेक,एरिक्स व्हिटेकरी,पाईड बेली शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद झाली आहे.
butterfly
फ़ुलपाखरे:१२१ प्रजातींच्या फ़ुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदन बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फ़ुलपाखरु (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फ़ुलपाखरु (१५ मी.मी.) आहे.ही दोन्ही फ़ुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमुन सामुहिक स्थलांतर करणारी ब्लु टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फ़ुलपाखरे या ठिकाणी ऑक्टो-नोव्हेंबर महिन्यात आढळतात
                                       
                                                                             (  BISON NATURECLUB)
                                                                                    RADHANAGARI
             

RADHANAGARI DAM

राधानागरी व आसपापरिसराला लाभलेली जलसंजीवनी म्हणजे राधानगरी धरण होय

राधानगरी धरण

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा मुख्य उपयोग शेतीसाठी पाणी पुरवठा व वीज निर्मितीसाठी होतो.
राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला. १९०७ ला त्यांनी धरणाची योजना पुढे आणली.
१९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्याचे "राधानगरी' असे नामकरण करण्यात आले. १९०९ ला धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून "राधानगरी' ओळखले जाते. बाकी आजही भक्कमपणाच्या बाबतीत या धरणाला तोड नाही.


धरणाची माहिती




gate
 

राधानगरी धरण
धरणाचा उद्देशसिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
भोगावती नदी
स्थानफेजीवडे, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा,महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस५५७० मि.मी.
लांबी१०३७ मी.
उंची३८.४१ मी.
बांधकाम सुरू१९०८
उद्‍घाटन दिनांक१९५५
ओलिताखालील क्षेत्रफळ१७२३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता२३६.७९ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ१८.१३ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता१० मेगावॉट