Sunday, December 28, 2014
Wednesday, December 10, 2014
Sunday, December 7, 2014
Thursday, November 6, 2014
Sunday, September 28, 2014
Thursday, August 7, 2014
Saturday, August 2, 2014
Tuesday, July 22, 2014
राऊतवाडी
मान्सून झाला सुरु…
सांगा कुठे कुठे मी फ़िरु…
मित्रहो,
आज महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या राधानगरी मध्ये मात्र वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या सर्वांग सुंदर परिसरामध्ये पावसाच्या सरींनी डोंगररांगना हिरवा शालू नेसवला आहे.
राधानगरी मध्ये सध्या लोकप्रिय असलेला व सर्व पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला राउतवाडी धबधब्यास आपण भेट देऊ शकता. या धबधब्यापर्यंत आपण अगदी आरामात पोहचता त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते. लहान मुलां पासून वयोवृद्ध पण इथे धबधब्याच्या पाण्यात मौज करू शकतत. या ठिकाणी धबधब्याच्या तिन्ही बाजूला असलेली उंच उंच झाडे,खुरटी झुडपे, उंच कड्यावरून अलगद पडणारे पाण्याचे तुषार झेलत पर्यटक जीवनाचा मनसोक्त आनंद घेतात. समोरच असलेले राधानगरी धरणाचे पाणी डोळ्यांचे पारणे फेडते . सर्वात स्वछ व सुरक्षित असा हा धबधबा सुट्टी दिवशी गर्दीने गजबजून जातो.
राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये समाविष्ठ असल्यामुळे अनेक ठिकाणी पूर्व परवानगी शिवाय जाता येत नाही . पण राधानगरी मधील बायसन नेचर क्लब ने सुरक्षित आणि अभयारण्यापासून जवळच्या पर्यटन स्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे. आता या परिसरामध्ये युवक मंडळे ,कौटुंबिक ग्रुप, शैक्षणिक ग्रुप, बचत गट ,ट्रेकर्स ,वृद्ध मंडळी ,महिला मंडळे, हौशी पर्यटकांना मान्सून पर्यटनाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध केले आहेत.
आपण राधानगरी किंव्हा दूधगंगा धारण आवर्जून पहिलेच पहिजे. आपल्याकडे वेळ व निसर्ग पर्यटनाची आवड असेल तर आपणास राउतवाडी ते दाजीपुर ते राधानगरी हा ४० कि.मि. चा जंगल मान्सून भ्रमंती करता येते. मस्त अंगावर पाउस झेलत रस्तावरून जाताना आपणास दोन्ही बाजूला हिरवळ,उंच उंच डोंगर रांगा ,छोटे मोठे धबधबे , ग्रामीण शेतकरी जीवन अनुभवता येते. आणि नशिबात असेल तर एखादा वन्यप्राणी गवा ,,सांबर ,भेकर आपणास दर्शन देऊ शकते. विविध पक्ष्यांचे आवाज व शीळ ऐकून मन प्रसन्न होते. याचवेळी वेगवेगळ्या वनस्पती आपणास निसर्गाची ओढ लावतात. साप व कीटक फुलपांखरे आपणास हमखास दर्शन देतात. दाजीपुरला पोहचल्या नंतर आपण फोंडा घाट मधील सह्याद्री पर्वत रांगा व कोकण चे विलोभनीय दृश्य पाहु शकतो. तसेच अंगावर पाउस झेलत राधानगरी धरनाच्या पाण्यामध्ये पोहायचा आनंद घेऊ शकतो.
या सोबतच अनेक हौशी व धाडसी पर्यटकांसाठी हसणे धरण धबधबा, गायकडा धबधबा, शेळप धबधबा, पठान पूल धबधबा, भैरी धबधबा, फोंडा धबधबा असे अनेक धाडसी ट्रेकिंग चे पर्याय पण उपलब्ध आहेत. पण या ठिकाणी जाण्यासाठी खूप पदभ्रमंती करावी लागते. राधानगरी परीसरामधील विविध पथावर फुललेले दुर्मिळ पुष्प ,ऑर्किड पाहण्यासाठी व खराखुरा जंगलातील पाउस अनुभवण्यासाठी राधानागारीला ह्या पावसात भेट द्या .
आपल्या भोजन,वाहन व निवासाच्या सोयी साठी नेचर क्लब आपणास सहकार्य करेल. अधिक माहिती साठी www.radhanagari.in ला भेट द्या. facebook.com/bison.natureclub
samrat-9604113743
sandesh-9923102589
rupesh-8149828055
atul-9503181855
Friday, July 18, 2014
Subscribe to:
Posts (Atom)