ऐतिहासिक बेनझीर व्हिला --राधानगरी धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे तलावातील बेनझीर व्हिला हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. १०० वर्षापूर्वी धरण ऊभारणीच्या काळात देखरेख करण्यासाठी आल्यावर थांबण्यासाठी शाहू महाराजांनी उंच टेकडीवर ही वास्तू बांधून घेतली होती.शाहू महाराज स्वतः येथे वास्तव्य करीत होते.तसेच कामासाठी येणाऱ्या तज्ञ लोकासाठी ही त्याचा वापर होत असे .धरण भरल्यावर ही टेकडी चोहो बाजूंनी पाण्याने वेढली जाते त्यामुळे या ठिकाणी जाता येत नाही.गेल्या कांही वर्षात धरण पुर्णपणे रिकामे झालेले नव्हते.या वर्षी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे धरण लवकर रिकामे झाले व ही वास्तू पर्यटकांना खुणावू लागली. या वास्तूचे मुळ स्वरूप दिसू लागल्याने गेल्या आठवड्या पासून मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत..
बेनझीर व्हीला स्वच्छता मोहिम. बायसन नेचर क्लब
बेनझीर व्हीला स्वच्छता मोहिम. बायसन नेचर क्लब
No comments:
Post a Comment