Thursday, June 25, 2015

२६ जुन २०१५ - छत्रपती राजर्षि शाहु महाराज यांचा १४१ वा जन्मदिन
महाराजांना मानाचा मुजरा.......
चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूरसंस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
अधिकारकाळ - इ.स.१८८४ - इ.स.१९२२
राज्याभिषेक - २ एप्रिल इ.स.१८९४
राज्यव्याप्ती - कोल्हापूर जिल्हा
राजधानी - कोल्हापूर पूर्ण
नाव - शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म - २६ जून इ.स.१८७४ कागल, कोल्हापूर
मृत्यू - ६ में इ.स.१९२२ मुंबई पूर्वाधिकारी - चौथे शिवाजी वडील - आपासाहेब घाटगे
आई - राधाबाई
राजघराणे - भोसले
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागलयेथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेचमूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

Sunday, June 7, 2015

radhanagari

जिल्हा - कोल्हापूर तालुका - राधानगरी शहर व खेडी - अर्जुनवाडा आकनुर आटेगाव आडोली आसनगाव आणाजे आपटाळ आमजाई व्हरवडे आवळी खुर्द आवळी बुद्रुक ऐजीवडे ऐनी ओळवण कंथेवाडी कंदलगाव कसबा तारळे कसबा वाळवे कोते कोनोली तर्फ आसनडोली कोनोली तर्फ ऐनघोल कोदवडे कौलव केळोशी खुर्द केळोशी बुद्रुक कपिलेश्वर करंजफेण कळंकवाडी कांबर्डे कांबळवाडी कासार पुतळे कारिवडे कुंभारवाडी कुकुडवाडी कुडूत्री कुह्राडवाडी खिंडी व्हरवडे खामकरवाडी गोतेवाडी गवशी गावठाणवाडी गुडाळ गुडाळवाडी घोटवडे घुडेवाडी चंद्रे चक्रेश्वरवाडी चांदे चांदेकरवाडी चाफोडी तर्फ ऐनघोल चाफोडी तर्फ तारळे जुने करंजे ठिकपुर्ली डिगस सोन्याची शिरोली सोळांकूर सरवडे सिरसे साबतवाडी सावर्डे सावर्दे सावर्धन सुळंबी ढेंगेवाडी नरतवडे नवे करंजे नानीवळे निदानखण तरसंबळे तळगाव तळाशी तिटवे धामोड धामणवाडी तुरंबे तारळे खुर्द दुबळेवाडी दुर्गमानवाड पंडेवाडी पडसाळी पडळी पडळी पैकी पोटखराब फेजिवडे फेजिवडे पैकी पोटखराब पनोरी भोपाळवाडी बनाचीवाडी बरगेवाडी फराळे भांडणे बावर्डे पिंपळवाडी पाटपन्हाळा पारडवाडी पिरळ पाल खुर्द पाल बुद्रुक पालकरवाडी पुंगाव बुजवडे बुरूंबाळी मजरे कासारवाडा मोघर्डे मौजे कासारवाडा मोहडे येळवडे म्हासुर्ली मल्लेवाडी मांगोली मागेवाडी राई माजगाव राजापूर मानेवाडी मानबेट राधानगरी रामणवाडी मालवे राशिवडे खुर्द राशिवडे बुद्रुक मुसाळवाडी लिंगाचीवाडी लाडवाडी वडाचीवाडी हसणे शेळेवाडी हेळेवाडी शेळप वाकी वाघवडे वाडदे शिरगाव राधानगरी तालुका राजर्षि शाहु महाराजांचे विशेष प्रेम असलेला येथील निसर्ग खुणावणारा , बांधुन ठेवणारा . येथील झाडवेलीनां जसा इतिहास आहे , तसाच इतिहास येथील प्रत्येक वास्तूला आहे. शतकोत्तरी लक्ष्मी तलाव आणि त्याचे स्वयंचलित दरवाजे म्हणजे संपुर्ण देशातील एक मॉडेल बाजुला साथ देणारे दुधगंगा , तुळशी जलाशय , त्याच्या बाजुच्या कड्यामधून कोसळणारे असंख्य धबधबे तिन्ही त्रतुंमध्ये विविध रूपानी भेटणारा निसर्ग आणि जगभरातील अत्यंत दुर्मिळ वनस्पतीनी समृध्द असा परिसर अभयारण्य - राजर्षि शाहु महाराजानी कोल्हापूर संस्थानाच्या दक्षिण - पश्चिमेस मुद्दाम राखून ठेवलेला १९.६१ चौरस किलोमिटरचा एक जंगल तुकडा म्हणजे गवा आणि अन्य प्राण्यांचे पहिले राखीव ठरलेले दाजीपुर अभयारण्य १९५८ मध्ये ते गवा अभयारण्य म्हणून घोषित झाले त्यानंतर राधानगरीचा लक्ष्मी तलाव आणि काळम्मावाडीचा राजर्षि शाहु सागराच्या पाणलोट क्षेत्राचे महत्व ओळखुन राज्य शासनाने १९८५ मध्ये या अभयारण्याचा ३५० चौरस किलोमिटर विस्तार करुन नव्याने ' राधानगरी अभयारण्य ' म्हणून घोषित केले आजही दाजीपुर आणि राधानगरी या दोन्ही ठिकाणी वन्यजीव क्षेत्राची कार्यालये असुन स्वतंत्र रक्षण होते पाहण्यासारखं - * राज्यातील एकमेव गवा अभयारण्य * शाहु महाराजानी बांधलेले धरण * काळम्मावाडीचा दुधगंगा जलाशय , तुळशी तलाव * पुर्णत्वाकडे निघालेला धामणी प्रकल्प * भोगावती दुधगंगेला जोडणारा गैबी बोगदा * चक्रेश्वरवाडीचे शिवमंदीर * दुर्गमानवाडची विठ्ठलाई देवी * वाकीघोलतील वाकोबा * रामनवाडी , राऊतवाडी , माऊलीचा कडा , शेळपमधील धबधबे * हसणेच्या पिछाडीस लघु पाटबंधारे प्रकल्पाचा परिसर * अभयारण्याच्या कुशीतील उगवाई मंदिर * शाहु महाराजानी राखिव ठेवलेल्या या जंगलात हत्ती वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर बांधलेला हत्ती महाल * लक्ष्मी तलावाच्या मधोमध असलेला महाराजाचा ' बेनगिरी ' हा ऐतिहासिक बंगला काळम्मावाडी - * डावा व उजवा कालवा * आजवर एक कोटीचा खर्च * २८ टीमसी पाणीसाठा * सात तालुक्यातील दिडशेवर गावानां भीजक्षेत्राला लाभ * डाव्या कालव्यावर अनेक ठिकाणी बोगदे तुळशी - * धामोड परिसर हिरवागार आपण साडेतीन टीएमसीचे धरण * भैरी सड्यात विठ्ठलाई देवीच्या मागे तुळशीचा उगम १९६८ ला सुरवात १९७२ च्या आसपास प्रकल्प पुर्ण धबधबे - * रामनवाडी * राऊतवाडी * शेळप * बांबर * माऊली कोंड धार्मिक - भोगावती कारखान्यामागील डोंगरावरील चक्रेश्वरवाडी हे धार्मिक ठिकाण पुरातन हेंमाडपंथी बांधकाम असलेले चक्रेश्वर ( महादेव ) मंदिर दुर्गमानवाडची विठ्ठलाई देवी येथे पाडव्याच्या आधी दोन दिवस यात्रा भरते वाकिचा वाकोबा आणि तुरंबेचा सिध्दिविनायकही पाहण्यासारखा सोयीसुविधा - * तालुक्याची ठिकाणी अनेक लॉजमध्ये राहण्याची किफायतशीर सोय * शासकीय विश्रामगृहाचे कोल्हापूरातून आरक्षण * राऊतवाडी धबधब्याशेजारी राहण्यासाठी एक खासगी हॉटेल आधिक माहितीसाठी बायसन नेचर क्लबने www.radhanagari.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे

न्यू -करंजे

 दाजीपुरला जाताना लागणारे दुसरे गाव न्यू -करंजे  च्या मागच्या बाजूला असणारी छोटीशी दरी